Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
जीवन सुसह्य होण्यासाठी जनहिताचा छंद जोपासला पाहिजेः डाॕ. अ. ना. रसनकुटे.
मुंबई : संदिप शिंदे..
साप्ताहिक भगवे वादळ प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी, धारावी, मुंबई येथे यशस्वीपणे पार पडलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक डाॕ. अ. ना. रसनकुटे, अध्यक्ष, कोकण प्रदेश (अ. भा. म. सा. परिषद ) प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
दिप प्रज्ललीत करून कार्यक्रमाला सुरूवात झाल्यावर रसनकुटे यांनी आपल्या उस्फुर्त भाषणात साप्तहिक भगवे वादळ चे संपादक श्री. दत्ता श्रावण खंदारे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. तसेच माणसाचं उर्वरीत जीवन सुसह्य व्हावे म्हणून साहित्य, पत्रकारीता, कला, क्रीडा, समाजकार्य यापैकी एकतरी छंद जोपासण्याची खरी गरज आहे.
पालकांनी आपल्या मुलांना दिवाळीसारख्या सणाला फटाका, खानपान साठी जास्त खर्च न करता त्याच पैशात मुलांना चांगली पुस्तकं आणून दिली पाहिजेत. जेणे करून मुलांना समाजात कसे वावरावे, कसे वागावे, किती, कसे आणि केव्हा बोलावे, वरिष्ठांचा आदर कसा ठेवावा याची जाण निर्माण होऊन
मुलांमध्ये चांगले संस्कार रूजतील आणि वाचन संस्कृती वाढविण्यास मदत होईल. प्रत्येकाच्या घरी एक छोटेखानी वाचनालय असायला हवे त्यामुळे आपल्याबरोबर घरच्या माणसांनाही वाचनाची आवड निर्माण होईल. असं प्रतिपादन केलं.
व्यासपीठावर श्री.अभिजित राणे कामगार नेते, श्री. प्रफुल्ल फडाके संपादक दैनिक मुंबई चौफेर, सौ. स्नेहल सुर्यकांत आंबेकर माजी. महापौर/ नगरसेवीका, श्री. बाबुराव माने मा. आमदार, श्री. प्रविण निचल होप फाॕउंडेशन, श्री. राजेश खंदारे जेष्ठ समाजसेवक आदी मान्यवरांनी उपस्थितांना आपल्या भाषणातून उदबोधक मार्गदर्शन केले.
या साप्ताहिकाला एक वर्ष पूण झाल्याच्या निमित्तानं सामाजिक,साहित्यिक, पत्रकारिता, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींचा विविध मानाचे पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. या बहारदार कार्यक्रमास जवळजवळ २०० हून अधिक लोकांची उपस्थिती लाभली होती.
संपादक श्री. दत्ता खंदारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ वृत्तपत्र लेखक दिलीप गाडेकर यांनी केले आणि कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
रिपोर्टर