Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मुंबई महानगरची मोठी बातमी..
अंधेरी के/पूर्व महापालिकेतील कार्यकारी अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,
५० लाखाची लाच मागणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले..
मुंबई : प्रतिनिधी..
मुंबई शहरात भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे यात मुंबईतील सर्व महानगर पालिका वार्ड देखील पुढे आहे अनधिकृत बांधकामना आर्थिक मोबदला घेऊन पाठीशी घालण्याची कामे भ्रष्ट महानगर पालिका अधिकारी सरास पणे करतात कित्येक वेळा भ्रष्ट अधिकारी यांना पकडल्या नंतर ही भ्रष्ट अधिकारी यांना निलंबन केले जात नाही, त्यामुळे कायदेशीर करवाहीला नजुमता भ्रष्ट कारोबार मोठ्या प्रमाणात चालू आहे,
मुंबई अंधेरी येथील के/पूर्व महापालिकेतून मुंबई जनतेत खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत ५० लाखाची लाच मागणाऱ्या अंधेरी येथील के/पूर्व महापालिकेतील कार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. मुंबई महानगर पालिकेतील के /पूर्व पालिकेतील कार्यकारी अभियंता सतिश विश्वनाथ पोवार याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
सुत्रान कडून मिळालेल्या माहितीनुसार, के/पूर्व महापालिकेच्या कार्यकारी अभियंता सतिश विश्वनाथ पोवार यांनी अनधिकृत बांधकामवर तोडक कारवाही न करण्यासाठी, कारवाही दाबण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी ५० लाखाची लाच मागितली होती. सदर ५० लाखचा व्यवहार करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी मनपा कार्यालयात पैसे घेऊन येण्यास सांगितले या प्रकरणाची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांना मिळताच त्यांनी भ्रष्ट आरोपीं विरोधात सापळ रचला. त्यात कार्यकारी अभियंता सतिश विश्वनाथ पोवार यास लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. भ्रष्ट मनपा कार्यकारी अभियंता सतिश विश्वनाथ पोवार याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंविण्यात आला आहे.
रिपोर्टर