Breaking News
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्
भारतीय संस्कृती ही विशाल हृदयी. सगळे सुखी होवोत, सर्वाना निरामय आरोग्य लाभो, कुणाच्याही वाटेला दुःख न येवो आणि सगळेच या मंगल घटिकेचे साक्षीदार बनोत. या उदात्त हेतूसाठी सध्या देशभर लगबग सुरु आहे.
दिवाळी.. अर्थातच परमोच्च आनंद म्हणजे दिवाळी. आनंदाला दिवाळी या शब्दाशिवाय दुसरा पर्यायी शब्दच नाही. भारतीय संस्कृतीतील सणांचा राजा म्हणजे दिवाळी. सुख समृद्धी.. ऐश्वर्य आणि दानशुरतेचे प्रतिक.
दिवाळी जवळ आली हे सांगावेच लागत नाही. दसरा झाला की वेध लागतात ते दिवाळीचे. मग कोजागीरी नंतरची आल्हाददायक थंडी सांगतेय की दिवाळी आलीय.
देशातील प्रत्येकाने सुखी.. समाधानी.. चिंतामुक्त.. आनंदी राहावे असे सगळ्यांनाच वाटते. हा आनंद प्रत्येकाला दिवाळीत लाभतो. त्यासाठी जनसामान्यही राजा होत कर्णाप्रमाणे उदार होत, हा आनंद वाटण्यास सिद्ध होतो. राजा असो वा रंक सगळ्यांना दिवाळीचा आनंद समानच.
दिवाळीत घरदारच नाही तर मनही स्वच्छ होणार. अंतकरणात शुद्ध सात्त्विक भाव प्रकटणार. रंगीबेरंगी रांगोळी, सनईचे गोड सूर.. दारोदारी सुंदर नक्षीदार कंदिल, स्वागताला पणत्यांची रोषणाई आणि घरोघरी दिवाळी फराळाचे खमंग तळणाचे सुवास.. याने देशात चैतन्य येणार.
दिवाळी म्हणजे नात्यांची बेरीज. मग नाते कोणतेही असो. जिव्हाळ्याने समाज, देश जोडणारे. या मंगल पर्वात कुणी शब्दानेही दुःखी होवू नये याची दक्षता घेतली जाते.
चला मग देशातील पैसा देशात राहण्यासाठी.. प्रत्येकाच्या वाटेला हा पैसा यावा म्हणून स्वदेशी वस्तूची खरेदी करु या. सर्वांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी प्रदुषणमुक्त दिवाळीचे उत्साहाने स्वागत करू या.
२४ प्राईम व्हिजन न्युज समुहा तर्फे आपण सर्वांना आणि मित्र परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!..
रिपोर्टर