Breaking News
भारताची हरनाज संधूने पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब
- तब्बल २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब भारताला
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
२००० साला नंतर म्हणजेच तब्बल २१ वर्षानंतर भारताने मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. हरनाजने अंतिम फेरीत पराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या ललेला मसवाने या दोघींना मागे टाकत विजय मिळवला. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्या आधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळाला.
हरनाजचे मिस युनिव्हर्स म्हणून नाव जाहीर होताच ती भावूक झाली.भारतासह जगभरातून हरनाजवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे. मिस युनिव्हर्सच्या मुकुटाची मानकरी ठरल्यानंतर हरनाझने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.