Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह विरुद्ध माहिती देण्यास नकार.
एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा 2005 चे कलम 24 अंतर्गत माहिती नाकारली.
भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित माहिती आरटीआय कायदा, 2005 अंतर्गत समाविष्ट आहे
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविली होती माहिती.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास एनसीबीने नकार दिला आहे. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा 2005 चे कलम 24 चा हवाला देत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती नाकारली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एनसीबीकडे अर्ज करत उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच विविध तक्रारींची सद्यस्थितीची मागणी केली होती. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा 2005 चे कलम 24 अंतर्गत माहिती नाकारली आहे. अनिल गलगली याविरोधात प्रथम अपील दाखल केले आहे.
अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित माहिती आरटीआय कायदा, 2005 अंतर्गत समाविष्ट आहे आणि कोणत्याही एजन्सीला यातून सूट नाही आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, जर मागितलेली माहिती भ्रष्टाचार आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित असेल तर ती वगळण्याच्या कलमातून सूट दिली जाईल, याचा उल्लेख करत गलगली यांनी अशी माहिती सार्वजनिक करून वेबसाइटवर अपलोड करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जेणेकरून ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.
आर्यन खानला अटक करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात तत्लाकिन एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच संदर्भात ज्ञानेश्वर सिंह हे मुंबईत आले होते.
रिपोर्टर