Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
उद्धव ठाकरे गटाला धक्का आणखी एक खासदार शिंदे गटात सामील.
शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ..
मुंबई : संदिप शिंदे.
शिंदे फडवणीस सरकारच्या महाराष्ट्र विकास कामाच्या गतीमुळे उद्धव ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यांपासून धक्के मिळत असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे लोक प्रतिनिधीं मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होण्याचे प्रकार वाढतच आहे. ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटात सामील झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार गजानन किर्तीकर आजारी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर गजानन किर्तीकर आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेला उधाण आले होते. शुक्रवारी गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती.
किर्तीकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेश चर्चेला पूर्णविराम मिळाला. खासदार गजानन किर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.कित्येक शिवसैनिकांसोबत हजेरी दरम्यान, माहीम विभागाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरिक सत्कार हा मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
सुत्रा कडून मिळाल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या भेटीनंतर वर्षा निवासस्थानावरून रवींद्र नाट्य मंदिराच्या कार्यक्रमाच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तीकर यांची देखील गाडी कार्यक्रम स्थळी पोहोचली. या कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर शिवसैनिकांन सोबत शिंदे गटात सामील झाले आहेत. या कार्यक्रमावेळी मंचावर खासदार भावना गवळी, शीतल म्हात्रे, विजय शिवतारे तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर