आशिया खंडातील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला..- देवेंद्र फडणवीस.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार..
दिल्ली..
दिल्ली वारीत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री आश्विन जी वैष्णव यांची भेट घेऊन धारावी पुनर्विकास प्रकल्प बाबत चर्चा करून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला.
प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात ‘डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली, ही बातमी सांगताना मला अत्यानंद होतो आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले यासाठी मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचे सातत्याने सहकार्य आहे. या ‘डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट’मुळे आशियातील सर्वांत मोठ्या अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
खा. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. ती मागणी सुद्धा यावेळी अश्विनी वैष्णव यांच्यापुढे मांडली असता याबाबत सकारात्मक विचार करण्याचे अभिवचन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.
रिपोर्टर