Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज
मराठी राज्यात मराठी लोकांना घर नाकारणे, संविधानाने दिलेला हक्क नाकारणे, महिलेचा छळ करणे या अनुषंगाने दोषीं पितापुत्रवर राज्य महिला आयोग ने दिले करवाहीचे निर्देश.
मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला सोसायटीने ऑफिस देण्यास नकार दिला. तसेच या महिलेशी सोसायटीच्या सदस्यांनी गैरवर्तन केले. सोशल मीडियाचा आधार घेत श्रीमती देवरुखकर यांनी आपली व्यथा सगळ्यांसमोर मांडली. तो व्हिडिओ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पाहण्यात आल्यानंतर आयोगामार्फत रुपाली चाकणकर यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून अहवाल मागण्यात आला आहे. सोबतच मुलुंड पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या सूचनेनुसार काल रात्री उशिरा मुलुंड मध्ये पोलिसांनी देवरुखकर यांना त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संविधानाने दिलेला हक्क नाकारणे, महिलेचा छळ करणे या अनुषंगाने दोषींवर कारवाई व्हावी होईल. याबाबत देवरुखकर यांना न्याय मिळेपर्यंत आयोग पाठपुरावा करेल असे रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ मार्फत स्पष्ट केले.
https://youtu.be/O9Akzkuz1-I?feature=shared
रिपोर्टर