Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
जरांगेंचे उपोषण महिनाभरासाठी मागे, पण आंदोलन सुरूच. पाच अटी वर जरांगे पाटील ठाम.
आंदोलनावर ठाम राहिलेल्या जरांगेंना अनेक मंत्र्यांसह संभाजी भिडे यांनी बुधवारी उपोषण थांबवण्याचे आवाहन केले.
जालना : प्रदीप मस्तकार
मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारचा आदेश धुडकावला. मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने एका महिन्याचा वेळ मागितला आहे.
यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना जरांगे मराठ्यांवर खापर फुटू नये, यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ देत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच महिन्यानंतर काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
सरकारच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर कायम जरांगेंच्या संपर्कात आहेत. आंदोलनावर ठाम राहिलेल्या जरांगेंना अनेक मंत्र्यांसह संभाजी भिडे यांनी बुधवारी उपोषण थांबवण्याचे आवाहन केले. यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना मनोज जरांगे मराठ्यांवर खापर फुटू नये, यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला.
महिन्यानंतर काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. लाठीचार्ज करून समाजातील लोकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मुख्य अटीसह इतर मागण्याही जरांगेंनी सरकारकडे केल्या. तसेच वेळ देऊनही सरकारने निर्णय घेण्यास दिरंगाई केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
रिपोर्टर