Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज.
थोडक्यात महत्वाची बातमी..
मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरातील प्रत्येक मार्ग, गल्लीबोळ स्वच्छ ठेवन्यायासाठी महानगर पालिका आयुक्तांची बैठक पार पडली.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. अश्विनी जोशी यांनी के (पूर्व) विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
मुंबई : प्रतिनिधी.
मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरातील प्रत्येक मार्ग, गल्लीबोळ स्वच्छ ठेवायला हवे. रस्त्यावरील कचरा हा दररोज उचलणे अपेक्षित आहे. यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) कॉम्पॅक्ट वाहनांचा वापर करावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले.
तसेच, सहायक मुख्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील (on field) उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. तेथील स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवून नियोजनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचनाही अश्विनी जोशी यांनी दिल्या.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. अश्विनी जोशी यांनी के (पूर्व) विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला.
उपायुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ ७) श्री. संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्यासह पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#mybmcupdates
रिपोर्टर