Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
एसीबी सापळ्या नंतर फरार झालेला महानगर पालिका के पूर्व वॉर्ड चा कार्यकारी अधिकारी मंदार तारी याला एसीबी ने केले गजाआड.
मुंबई : वृत्तसंस्था.
अंधेरी येथील इमारती मधील अनधिकृत बांधकामांना अभय देण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी मारणारा मनपा के पूर्व वॉर्ड कार्यालयातील अधिकारी मंदार अशोक तारी (43) याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची अंधेरीच्या जे.बी.नगर, शहीद भगत सिंग कॉलनीत चार मजली इमारत आहे या इमारती वरील दोन मजले अनधिकृत बांधले होते. त्यावर पालिकेने कारवाई करू नये, तसेच या बांधकामाला सहकार्य करावे, यासाठी मंदार तारी याने दोन कोटी मागितले होते.
दरम्यान एसीबी च्या सापळ्यां नंतर मंदार तारी हा फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जमिनीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर एसीबी ने त्याला गजाआड केले.
तक्रारदार यांनी 31 जुलैला मंदार तारी विरोधात तक्रार दिली होती. एसीबी ने केलेल्या पडतळणीत तारी याने दोन कोटीची मागणी करून लाचेचा 75 लाखाचा पहिला हप्ता मागितल्याचे स्पष्ट झाले.
तारी याच्या सांगण्यावरून कंत्राटदार प्रतीक पिसे (35) आणि दलाल मोहम्मद शेहजादा यासीन शाह (33) हे पैसे घेण्यासाठी आले असता एसीबी च्या पथकाने त्यांना अटक केली होती पण मनपा अधिकारी मंदार तारी हा पसार झाला होता. सदर प्रकरणामुळे महानगर पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायद्याचा वचक असणे आवश्यक आहे.
रिपोर्टर