Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाचा मोठा दावा 2025 पासून मिळणार कर्करोगावर फ्री वॅक्सिन...
लसीचा वापर हा ट्युमारची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी होऊ शकतो असा दावा रशियाने केला आहे.
मॉस्को : वृत्तसंस्था.
एकीकडे जगभरात कर्क रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. रशियाने कर्करोगाची लस तयार केली आहे. तसेच रुग्णांना ही लस मोफत मिळणार आहे.
या लसीचा वापर हा ट्युमारची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी होऊ शकतो असा दावा रशियाने केला आहे. जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त झाले आहे. अश्या परिस्थितीत रशियाने हा दावा केल्यामुळे जगभरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुरशको यांनी याबाबत माहिती दिली कर्करोगावर बनवण्यात येणारी लस 2025. च्या सुरवातीला लॉन्च केली जाईल. रशियातील कर्करोगाच्या रुग्णावर मोफत उपचारही करण्यात येतील.
रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर एंड्री कप्रिन यांनी देखील या लसीबद्दल माहिती दिली. दरम्यान ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचारासाठी तयार करण्यात आली आहे. याबाबत अद्याप माहीत मिळालेली नाही. तसेच या लसीला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही
रशियातील कर्करोगाच्या रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2022 मध्ये 6 लाख 35 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे आता रशियाच्या या नव्या दाव्याने अनेक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रिपोर्टर