Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेच्या त्यां लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार छाननी..
लाडकी बहिण योजनेत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्या सर्व अर्जाची छाननी करून त्यात अनियमता आढळल्यास त्या लाभार्थी महिलांना बाद केले जाईल : अदिती तटकरे, माजी महिला व बालकल्याण मंत्री.
मुंबई : वृत्त प्रतिनिधी.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुक निकालानंतर महायुती ला भरघोस विजय मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला कलाटणी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आणि घरात चार चाकी वाहन असलेल्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यात नियमबाह्य अर्ज बाद करण्यात येतील अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
महायुती सरकारच्या शपथविधी सभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच निकाषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आल्याची माहिती दिली. त्यामुळे 15 ते 20 टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
ही योजना कुटुंबातील दोन महिलांसाठी 21 ते 65 वय असलेल्यांना लागू करण्यात आली. महिलेचे बँक खाते, कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी असावे या दोन अटी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील पात्र वयोगटातील 47 लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. राज्य सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
दहा लाख उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले असून खऱ्या गरजवंताला रक्कम मिळावी या उद्देशाने पुढील महिन्यात अर्जांची छाननी करण्यात येणार असून नियमबाह्य अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.
लाडकी बहिण योजनेत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्या सर्व अर्जाची छाननी करून त्यात अनियमता आढळल्यास त्या लाभार्थी महिलांना बाद केले जाईल : अदिती तटकरे, माजी महिला व बालकल्याण मंत्री.
रिपोर्टर