Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष कार्यकारिणीची बैठक वरळी येथील एनएससीआयच्या सभागृहात पार पडली.
आगामी लोकसभा निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून त्यासाठी कंबर कसून तयारीला लागण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
शिवसेना पक्ष कार्यकारिणीची बैठक वरळी येथील एनएससीआयच्या सभागृहात पार पडली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्यांना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
आगामी लोकसभा निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून त्यासाठी कंबर कसून तयारीला लागण्याचे आवाहन सर्वांना केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात घडलेला बदल या गोष्टी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपापसातील हेवेदावे दूर सारून महायुती म्हणून एकत्र येऊन लढल्यास आपला नक्की विजय होईल असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणारे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी राज्यातून महायुतीच्या 45 हून अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, सचिव, प्रवक्ते, स्टार प्रचारक, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, मतदारसंघाचे निरीक्षक, पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर