Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
कांदिवली तील छत्रपती शिवाजी राजे संकुलात भटक्या कुत्र्यांची दहशत, महानगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष.
भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने संकुलातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : संदिप शिंदे
मुंबईत मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची वाढ झाली असून महापालिकेकडून उपाय योजना होत नसून त्याचा त्रास हा स्थानिक नागरिकांना भोगावा लागत आहे. प्रसार माध्यमातून भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असल्याचा बातम्या, व्हिडिओ प्रसारित होत असून अद्याप महानगर पालिका कडून दुर्लक्ष होत आहे.
मुंबई कांदिवली येथील चारकोप विभागातील छत्रपती शिवाजी राजे संकुलात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक लोकांनी तक्रारी सुद्धा दिल्या असून मनपा दुर्लक्ष करीत असल्याची खंत नागरिकांन मध्ये आहे.
मागील काही महिन्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने संकुलातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच संकुलातील हर्षद सुनील उगलमुगले या 15 वर्षीय मुलाला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेत रक्तबंबाळ केल्याची घटना घडली त्यामुळे स्थानिक नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण असून घराबाहेर मुलांना पाठवणे अवघड झाले असून याबाबत स्थानिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दिली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकामधून होत आहे.
रिपोर्टर