Breaking News
अमरमहाल ते वडाळा दरम्यान ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन दहा महिन्याच्या विक्रमी कालावधीत पूर्ण
पहिल्या टप्प्यातील खनन काम चार महिने आधीच पूर्ण
दीड महिन्यांनी सुरु होणार दुस-या टप्प्याचे काम
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा सुधारणेसाठी हाती घेण्यात आलेल्या अमरमहाल ते परळ या सुमारे ९.८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमरमहाल ते वडाळा आणि वडाळा ते परळ अशा दोन टप्प्यात खनन (टनेलिंग) करण्यात येत आहे. यापैकी अमरमहाल ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील ४.३ किलोमीटर लांब जलबोगद्याचे खनन १४ महिन्यांच्या नियोजित कालावधीच्या ४ महिने आधीच म्हणजे अवघ्या १० महिन्यांमध्ये पूर्ण करुन महानगरपालिकेने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे प्रकल्पाचा वेग वाढणार असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आठवड्यावर येवून ठेपला असताना ही विक्रमी कामगिरी अभियांत्रिकी क्षेत्राच्या दृष्टीने कौतुकास्पद ठरली आहे.