Breaking News
मुंबईत तीन ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन संपन्न
- सुरुवातीच्या ३ महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हुतात्मा चौक, काळाघोडा चौक आणि राम्पार्ट पदपथ या तीन ठिकाणी नियोजित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले. हे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज हुतात्मा चौकात छोटेखानी समारंभात करण्यात आले.