Breaking News
गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
- ३५ अतिक्रमणे निष्कासित
- १४ बांधकामे लवकरच काढणार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने प्रगतीपथावर असलेल्या गोरेगांव- मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने निष्कासित केली. ही अतिक्रमणे हटविल्याने या प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली असून प्रकल्प निर्मितीला वेग मिळणार आहे. आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.