Breaking News
राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून होणार खुली
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतांची घोषणा
- दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.